सूर्यग्रहणाच्या भीतीने घात केला; तिने नवऱयाला भोसकले पोटच्या पोरालाही मारले

0
12

महिलेने सूर्यग्रहणाचे परिणाम खूप मनावर घेतले होते, त्याचा तिच्यावर इतका प्रभाव होता की, तिचे

मानसिक संतुलन बिघडले होते.

अमेरिकेच्या एका अॅस्ट्रोलॉजी एन्फ्लुएन्सरने सूर्यग्रहणाच्या भीतीने आपल्या नवऱयाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना अमेरिकेत घडली असून डॅनियल जॉन्सन असे महिलेचे नाव आहे. डॅनियल अयोका नावाची तिची स्वतःची वेबसाईट असून ती याच नावाने ओळखली जायची. डेनियल जॉन्सन आपल्या वेबसाईटवर दर आठवडय़ाला औरा क्लिनसिंगचे सादरीकरण करायची. त्या वेळी ती राशीभविष्य वाचायची. डॅनियल सूर्यग्रहणाबद्दल खूप संशोधन करत होती, ज्यामुळे तिला भीती वाटू लागली होती. म्हणून तिने पायलट असलेल्या तिच्या 29 वर्षीय पतीच्या छातीत चाकूने सपासप वार केले, यात त्याचा मृत्यू झाला. मग ती तिच्या नऊ वर्षांच्या आणि आठ महिन्यांच्या मुलांना घेऊन कारने निघाली व धावत्या कारमधून त्यांना बाहेर फेकले. या घटनेत आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला असून मोठा मुलगा जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Spread the love