जळगाव – जिल्ह्यात एकूण १ हजार ३२३ परवानाधारक शस्त्र असून निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर आज पर्यंत ९८५ शख विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.
तर ११५ शस्त्रधारकांना सूट देण्यात आली आहे. चार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.
तर दोन परवाने रद्द करण्यात आले आहेत. अद्याप पर्यंत २७ शख जमा होणे बाकी आहे. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमा अंतर्गत आतापर्यंत ४ हजार ७०० प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत. तर ३ हजार २८७ जणांना अटक करण्यात आली आहेजिल्ह्यात एकूण ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी सत्यता पडताळून १२ तक्रारी वगळण्यात आल्या तर ५४ तक्रारीवर विहित काळात कार्यवाही करण्यात आली.