चोपडा: संपूर्ण सप्टेंबर महिन्यात रोज सातत्याने पाऊस पडत आहे, त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.कापुस, मका, कांदा , कडधान्य पिकाचे मोठे नुकसान झाले आहे
तरी संपुर्ण चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून, सरसकट सर्व शेतकर्यांना हेक्टरी 30,000 त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चे निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील , चोपडा तालुका अध्यक्ष सचिन शिंपी, उपतालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस विनोद धनगर योग्यश पाटील श्रिराम पाटील आदी उपस्थित होते.