सुनसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी !

0
44

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ काजल कोळी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच उपसरपंच एकनाथ सपकाळे व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांनी पूजन केले तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विकास वाचनालयात चेअरमन सुदाम भोळे व संचालक माधव सपकाळे तसेच सदस्यांनी व पदाधिकारी यांनी पूजन केले. यावेळी दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सुध्दा महामानवाला अभिवादन करण्यात आले. तक्षशिला मित्र मंडळाने येथील बसस्थानक चौकात मोठे बॅनर लावले आहे तसेच ग्रामपंचायत कार्यालया समोर मंडप टाकून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील ग्रामस्थांनी व पदाधिकारी यांनी केले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सपकाळे , आनंदा सपकाळे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली या रस्त्यावर जगलेली मात्र पाण्याअभावी सुकत चाललेल्या झाडांना आळे करून पाणी देण्यात आले.तसेच या झाडांना ट्री गार्ड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे नियमितपणे मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तक्षशिला बुद्ध विहारात स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Spread the love