प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील अवघ्या आठ महिन्याच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याने साकेगावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , रंजिता अर्जुन भील रा लेंडीपूरा साकेगाव यांनी फिर्याद दिली आहे की दि.२३एप्रिल रोजी दुपारी दिड ते दोन च्या सुमारास खाटेला बांधलेल्या झोक्यातून अज्ञात दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी चा मुलगा अरविंद अर्जुन भील वय ८ महिने याचे अपहरण केले आहे. अशी फिर्याद तालुका पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीएन एस भाग ०५ गुरनं ००९६/२०२४ भादवि ३६३,४५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय विशाल पाटील करीत आहेत .