हेमकांत गायकवाड
महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे शेतमालास राज्य सरकारने केंद्रास फक्त१५%नफा धरून कळवलेल्या भावाच्या चाळीस टक्के कमी आधारभूत किंमत देशाने ठरवली,ती देखील कधी त्याला मिळाली नाही. तसेच गेली दोन वर्ष कोरोणा चे व त्यासोबत दुष्काळ आणि अतिवृष्टीची गेलीत….म्हणजे शेतकरी चा चारही बाजूने पार चेंदा मेंदा झाला आहे .आज बरीच मंडळी दुष्काळ जाहीर करा म्हणत आहे .पण दुष्काळ जाहीर करून अथवा अतिवृष्टीचे पंचनामे करुन काहीही साध्य होणार नाही,कुणाही शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज दिले नाही,तसेच काही मदत मिळण्याची देखील शक्यता नाही . राज्यात ज्याही मागण्या सुरू आहेत त्या फक्त राजकीय दृष्टिकोनातून असल्याने मा पंतप्रधान ना नरेंद्रजी मोदी साहेब यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना या दुःखातून बाहेर काढण्याचा मास्टर प्लॅन तयार करन्याचे आदेश द्यावेत व…शेतकऱ्यांना नवीन उभे राहण्यासाठी काय काय योजना आखता येतील उदा:- सरकार कडे शिल्लक असलेले प्रचंड बियाणे व खते शिल्लक आहेत ते शेतकऱ्यांच्या मागणी नुसार फुकट द्या.
देशाच्या गरजेनुसार ज्यांना तुम्ही ते बियाणे दिले त्यांचे खऱ्या उत्पादन खर्चाचे आधारे शेतमाल खरेदीची हमी द्यावी तसेच शेतकऱ्यांना मुलांना कोठेही प्रवेश घ्यावयाचा असेल तर आताचे व पुढील वर्षी फी लागणार नाही याची काळजी घ्या.पंजाब सरकार ने जसे शेतकऱ्यांचे शेती व घराचे वीजबिल माफ केले तसे भले नका करू, पण किमान शेतीचे माफ करा व घराचे सवलतीच्या दरात द्यावें.
दवाखान्यात साऱ्या आरोग्य सुविधा फुकट व चांगल्या दर्जाचे मिळतील याची काळजी घ्या व पुढील हंगामात त्याला हवे तेवढे कर्ज मिळेल याची व्यवस्था करावी.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी थातुर मातुर कामांच्या निधी भलेही बंद करावा पण शेतकरी वाचेल असे कायम स्वरुपी धोरण आखले तरच शेतकरी वाचेल असेही निवेदनात म्हटले आह . आपण राजकारण विरहित माणुसकीने हा निर्णय घेणार अशी अपेक्षा देखील निवेदनात व्यक्त केली असून निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी स्वीकारले यावेळी शेतकरी कृती समिती चे समन्वयक एस बी पाटील,राधेश्याम पाटील,चंद्रकांत पाटील हजर होते.