★तडवी कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात
★बबलू तडवी यांचे निवेदन
चुंचाळे येथील रहिवाशी असलेले बबलू तडवी यांनी आपल्या घराजवळ असलेल्या गटारीचे सांडपाणी घरात जात असून त्यामुळे कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अशा संदर्भाचे निवेदन गेल्या दोन महिन्यांपासून चुंचाळे ग्रामपंचायतीला दिलेले होते मात्र त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याची किती काळजी आहे ? हे यावरून दिसून येत आहे.
याबाबत निवेदनानुसार असे की, गावातील तडवी वाडयातील बबलू मुराद तडवी यांनी आपल्या घराजवळ असलेल्या सांडपाण्याची गटार तुटलेली व खराब झालेली असून गटारीचे सांडपाणी घरात घूसत आहे. या सांडपाण्यामुळे घराच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे व परिसरातअस्वच्छता निर्माण झालेली आहे.त्यामुळे तडवी यांच्या कुटुंबियातील सर्व जण आजारी पडलेली असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबधित निवेदन तडवी यांनी दि.१ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रामपंचायत प्रशासनास दिले होते व निवेदना मार्फत त्यांनी सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांना कळकळीची विनंती करून गटारीची समस्या सोडण्याची मागणी केली होती मात्र तब्बल दोन महिन्यांपासून तडवी यांच्या अर्जावर अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची ग्रामपंचायतीला किती काळजी आहे ? ते ग्रामस्थांच्या अर्जावर किती गंभीरपणे घेत आहे ? हे दिसून येत आहे. दरम्यानच्या काळात गावात डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू सदृश्य आजारांचे दोन रुग्ण आढळून आलेले आहे व त्यासह इतरही आजारांचे रुग्ण गावात आहे. त्यामुळे गावात स्वच्छता व साफसफाई ठेवणे ही जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे.
ग्रामसेवकांचे आश्वासन – सदर तडवी यांच्या अर्धावर ग्रामसेवक सौ प्रियंका बाविस्कर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,मी लवकरात-लवकर सदर गटारीची समस्या मार्गी लावते मात्र तात्काळ सोडावी.