साकळी येथील श्री भवानी माता मंदिर ट्रस्ट च्या अध्यक्षपदी भिका पाटील तर उपाध्यक्षपदी भागवत रावते यांची निवड

0
47

साकळी येथील श्री भवानी माता मंदिर ट्रस्ट च्या अध्यक्षपदी भिका राजाराम पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भागवत मोहन रावते यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. सदर निवडी संदर्भाची सभा श्री भवानी माता मंगल कार्यालयात दि.२९ रोजी पार पडली. सभेस मागील कार्यकारणी अध्यक्ष संजय छगन पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. नवीन कार्यकारणीत संजय छगन पाटील (सचिव) काशिनाथ तानकु पवार (खजिनदार) संजय विनायकराव पाटील (सहसचिव)तर संचालकपदी अशोक कोंडू चौधरी, पांडुरंग मंगा निळे, प्रल्हाद रामचंद्र पाटील, सुधाकर सिताराम बाविस्कर, भास्कर बुधो तायडे, भगवान शंकर शिरसाळे, अरुण बळीराम कोळी,नितीन दगडू महाजन,निंबा केशव पाटील, पंडित गणपत मराठे,पंडित रामदास पाटील, सुखदेव खूपचंद बडगुजर यांची तर तज्ञ सल्लागार पदी नितीन मोहन पाटील यानुसार नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे. नव्याने निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीची सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

Spread the love