चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा..

0
18

चोपडा : भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चा पदाधिकार्‍याकडून मा.तहसिलदार अनिल गावित यांना चोपडा तालुक्यात अतिरिक्त पावसामुळे 31हजार 517हेक्टरवरील खरीप पिकांचे मुग,उडीद,तीळ, ज्वारी,बाजरी,मका,कापूस,सोयाबिन,कांदा,सुर्यफुल,कडधान्ये आदि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे,कापुस पिकावर बोंडअळी,व लाल्यारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे,ज्वारी,मका,आदी पिकांवरदेखील अळींचा प्रादुर्भाव झाला आहे,हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे,शेतकरी बांधवांनी आपल्या लेकराबाळांसारखं जीव लावून वाढवलेली पिकं जमिनदोस्त झाले आहे,निसर्गाने मारलं..आता शासनाने तारलं पाहिजे.. म्हणून राज्य शासनाने चोपडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहिर करुन शेतीपिकांचा पंचनाम्याचा फार्स न करता शेतकर्‍यांना पिकपेरानुसार सरसकट आर्थिक नुकसान भरपाई देवून मदत करावी अशी मागणी मा.तहसिलदार चोपडा यांना निवेदन देवून राज्य शासनाकडे करण्यात आली.
या निवेदनार पंकज पाटील तालुकाध्यक्ष,अंबादास सियोदिया किसान मोर्चा तालुकाध्यक्ष,गजेंद्र जैसवाल शहराध्यक्ष,भूषण महाजन शहर किसान मोर्चा अध्यक्ष,किसान मोर्चा उपाध्यक्ष मगन महाजन,विनायक पाटील,मा.उपसभापती भुषण भिल,सरचिटणीस,हनुमंतराव महाजन,चंद्रकांत धनगर,राहुल पाटील,भरत सोनगिरेसर,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष कांतिलाल पाटील, बापूराव पाटील,विठ्ठल पाटील,बुथप्रमुख विजय बाविस्कर,कोषाध्यक्ष धरमदास पाटील,युवा मोर्चा उपाध्यक्ष विवेक गुजर, अनु.जाती शहराध्यक्ष अभिषेक सुर्यवंशी,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दिनेश मराठे, उपाध्यक्ष,कृष्णा बाविस्कर,तालुका सोशल मिडीया प्रमुख विजय पाटील,
आदि पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..

Spread the love