मुफ्ती हारून नदवी यांच्या कारचा अपघात

0
10

जळगाव – सामाजिक कार्यकर्ते मुफ्ती हारून नदवी यांच्या कारचे टायर फुटल्याने कारचा अपघात झाल्याची घटना सोमवार 27 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ घडली आहे.

या अपघातात कारचालक आणि एक मुलगी जखमी झाली असून मुफ्ती हारून नवी व त्यांची पत्नी हे किरकोळ जखमी झाले आहे.

खाटीक बिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी हे आपल्या परिवारासह मुंबई येथे गेले होते. दरम्यान ते मुंबईवरून जळगावकडे येत असताना सोमवारी 27 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ त्यांच्या कारचे टायर फुटले. त्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात कारचालक व मुलगी हे जखमी झाले असून मुफ्ती हारून नदवी व त्यांची पत्नी हे किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना घडल्यानंतर पाळधी गावातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना तातडीने उपचारासाठी वाहनातून रवाना केले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाटीक बिरादरीचे सदस्य व नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात

Spread the love