दगडफेकीप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल, १४ जणांना अटक

0
11

जामनेर –  येथील जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याप्रकरणी व पोलिसांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एकूण ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १४ जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. (केसीएन)तर १५ पोलीस जखमी झाले आहेत. सदर घटनेचा तपास हा एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला दि. २५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपीला आमच्या ताब्यात द्या असे म्हणून गुरुवारी दि. २० जून रोजी संध्याकाळी ७ वाजेला जमाव मोठ्या संख्येने जामनेर शहरात जमला होता. (केसीएन) या जमावाने शहरात टायर जाळणे, तसेच दुचाकींना आग लावून पेटविणे असे प्रकार सुरू केले होते. त्यानंतर पोलीस त्यांना समजावित असताना मात्र त्यांनी काही एक ऐकून न घेता पोलीस स्टेशनवर दगडफेक केली.

तसेच या दगडफेकीत पोलीस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक दीपक रोठे, हेडकॉन्स्टेबल रमेश कुमावत, रामदास कुंभार, संजय खंडारे, प्रीतम बरकले, किशोर चंदनकर, सुनील राठोड, अतुल पवार, जितू ठाकरे, हितेश महाजन या जामनेरच्या पोलिसांसह आरसीपी पथकातील राहुल निकम, कृष्णा शेळके, मेहुल शहा, भावेश देवरे हे जखमी झाले आहे. (केसीएन) या घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे (वय वर्ष २९) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार संशयित आरोपी म्हणून शालूसिंग शेवाळे (रा. गिरजा कॉलनी, जामनेर), अशोक बंडू भिल (रा. खडकी ता. जामनेर), श्रीराम भिल, पंकज देविदास ठाकरे (दोन्ही रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर), प्रमोद विश्वनाथ सुरवाडे, युवराज सुकराम पवार, आकाश युवराज पवार (तिन्ही रा .जामनेरपुरा), प्रदीप रवींद्र कोळी, रितेश जितू मोरे, अमोल हरदास सोनवणे (सर्व रा. सामरोद ता. जामनेर), मंगल ज्ञानेश्वर ठाकरे (रा. हिवरखेडा ता.जामनेर), दीपक अशोक पवार (रा. चिंचोली ता. जळगाव), आकाश सुनील पवार (रा. ओझर ता. जामनेर) या १३ संशयीतांसह ३०० ते ४०० महिला व पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेमध्ये आरसीपी पथकातील सरकारी वाहन (एम एच १९ एम ९२३६) देखील क्षतिग्रस्त झाले आहे. तसेच जामनेर पोलीस स्टेशनच्या सर्व खिडकी, दरवाजे, टेबलांचे काचा फुटून नुकसान झाले आहे. घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.(केसीएन) बालिकेवर अत्याचार करून खून करणारा संशयित आरोपी सुभाष उमाजी भिल (वय ३५, रा. भिलखेडा ता. जळगाव) ला शुक्रवारी दि. २१ जून रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती शरद पवार यांनी पाच दिवसांची म्हणजेच २५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Spread the love