दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

0
20

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी कार्यालयासमोरील रोडवर हा अपघात झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला. अमित शिंगा पावरा (मांडळ, ता.अमळनेर) असे मयताचे नाव आहे.

दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

अमित पावरा हा मुलगा आपल्या कुटुंबासह अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वास्तव्याला होता. अमित याला पिंगळवाडे येथील आश्रम शाळेत दाखल करण्यासाठी त्याचे वडील शिंगा पांडू पावरा यांच्यासोबत सोमवार, 24 जून रोजी दुपारी साडेचार वाजता अमित हा दुचाकीने जाण्यासाठी निघाले. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी कार्यालयासमोरील रोडवून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या एका दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात बाप-लेक दोघे जखमी झाले. त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता अमित याला वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी रात्री नऊ वाजता दुचाकीचालक अजय वानखेडे (रा.आर्डी, ता.अमळनेर) याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे

Spread the love