जळगाव – वरणगाव आयुध निर्माणीतील आय एक ए विभागातील गुणवत्ता चाचणीचे कनिष्ठ कर्मचारी प्रबंधक (जे , डल्ब्यु, एम) ला आपल्या स्कुटरच्य होड लाईट मध्ये पाच ए .७ . ६२ चे गोळ्या मोटर सायकलीत लपवून घेऊन जात असताना सुरक्षा विभागाने पडल्याची घटना दि. २६ बुधवार रोजी निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ उघडकीस आली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुध निर्माणीतील गुणवत्ता अश्वासक विभागाचे कनिष्ठ अभियंता सतिष जयसिंग इंगळे हे दुपारच्या १२ . ४५ वाजेच्या सुमारास जेवणाच्या सुट्टीत निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या मोटर सायकल क्र एम एच १९ ए टी १५०४ या दुचाकीने बाहेर जात असताना त्यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक सि व्ही भारंबे यांनी त्यांच्या अंगाची झडती घेऊन दुचाकीची तपासणी केल्या नंतर दुचाकीच्या हेडलाईडच्या वरच्या भागात गाडी पुसण्याच्या कपड्यात ए के ४७ बंदुकीत मध्ये वापरणारी ए ७ . ६२ च्या पाच गोळ्या चोरीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे अढळून आल्या.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला निर्माणी सुरक्षा अधिकारी संभाजी सुधाकर पाडवे यांच्या फिर्यादी नुसार भा द वी कलम ३८० , शस्त्र अधिनियम १९५९ / ६० चे कलम २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून सतिष जयसिंग इंगळे यांना अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास उप निरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.