दिपक नेवे
शिरसाड गावाला कुटुंबाचा घटक समजून अनेक विकास कामे दिलेली आहे. या गावाला विकासकामे देतांना मी कधीही हात आखडता घेतला नाही. कुटुंबाप्रती कर्तव्य म्हणून मी या गाव परिसराचा विकास करीत आहे. परिसराचा विकास म्हणून आता मोठ्या निधीचा रस्ता टाकला आहे गावात विविध विकास कामे दिली पाहिजे हेच माझे ध्येय आहे. कारण या गाव- परिसराने मला खूप प्रेम दिले आहे. विद्यमान आमदार सौ लताताई सोनवणे यांना मोठ्या मताधिक्क्याने मतदारांनी निवडून दिलेले आहे व शिवसेनेचा भगवा फडकविला आहे ही अभिमानाची बाब असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढील आमदार शिवसेना होईल असा विश्वास माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केला.
तसेच येत्या जि.प. व पं.स. निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करा असेही आवाहन त्यांनी केले.
शिरसाड ते पिळोदे रस्ता या चार कोटी रुपये निधी कामांचे शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
शिरसाड ते पिळोदा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासुन अत्यंत खराब नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती या समस्येची दखल घेत आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन हा रस्ता मंजुर करण्यात आला या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ दि.३ रोजी शिरसाड येथे करण्यात आला रावेर लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांच्या हस्ते चोपडा विधानसभेच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे,रावेर लोकसभा क्षेत्राचे सहसंपर्कप्रमुख माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. चोपडा विधानसभा क्षेत्रातील शिरसाड ते पिळोदे गावापर्यंत सुमारे तीन किमी लांबीचा रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण खर्च सुमारे चार कोटी रुपये असणार या रस्त्याच्या कामामुळे परिसराच्या विकासात मोठी भर पडणार आहे व नागरिकांच्या वापरासाठी सोयीचा होणार आहे याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील ( मुन्नाभाऊ ) , शिरसाड चे माजी सरपंच तथा युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रविण (गोटू) सोनवणे , पिळोदा गावाचे सरपंच मनोहर पाटील , माजी उपसभापती भारसिंग तेरसिंग बारेला , कोरपावली सरपंच विलास अडकमोल , संतोष खर्चे , शरद कोळी , भरत चौधरी , महेन्द्र चौधरी , गोकुळ कोळी , संतोष महाजन , योगेश कोळी , प्रकाश कोळी , अनिल कोळी , चंद्रशेखर साळुंके , उदयभान पाटील , धनराज पाटील यांच्यासह विविध गावातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने या प्रसंगी उपस्थित होते.
आपल्या उद्घाटन भाषणात शिवसेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख विलास पारकर म्हणाले की,रस्ता हा फक्त विकासाचा मार्ग नसून आरोग्याचा सुद्धा मार्ग आहे. रस्त्याने परिसर जोडला जातो. याकरता आ. सौ. लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे टाकलेली आहे हे परिसराचे भाग्य आहे. अतिशय प्रामाणिकपणे व अहोरात्र काम करणारे हेे आमदार दांपत्य आहे तसेच प्रा. सोनवणे यांचा रावेर लोकसभा मतदारसंघातील जनसंपर्क पाहता त्यांनी लोकसभेची तयारी करावी असे विलास पारकर यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच
याप्रसंगी शिरसाड परिसर- पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवसेना युवा सेनेचे कार्यकर्ते- पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपकाळे सर यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील (शिरसाड)यांनी केले.












