साकेगाव शिवारात अनोळखी तरुणाचा नग्नावस्थेत मृतदेह ?

0
16

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव शिवारात नवोदय विद्यालयाच्या मागे गट नंबर ३१७/१ यज्ञेश नेमाडे रा.हनुमान नगर भुसावळ यांच्या शेतात दि.१८ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान अंदाजे २० ते २२ वर्ष वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला आहे या बाबत यज्ञेश नेमाडे यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन ला फोन करून खबर दिली असून पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अकस्मात मृत्यू क्रमांक २५/२०२४ कलम बी. एन. एस. एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचा दुर्गंधी येत होती. मयताची उंची चार फूट असून केस कलर केलेले आहे . घटना स्थळा जवळ पांढऱ्या रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट व निळ्या रंगाची फूल पॅन्ट मिळून आली आहे.

या घटनेचा तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे करीत असून या बाबत माहिती मिळाल्यास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन फोन नंबर ०२५८२/ २४२१९९ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love