धरणगाव – शेतमजूर महिलांना शेतात घेवून जाणारे वाहन अचानक उलटून एक महिला ठार तर सात जण जखमी झाले. ही घटना धरणगाव येथे बाजार समितीनजीक मंगळवारी सकाळी ८:३० वाजता घडली.
चंद्रकलाबाई जीवन महाजन (६६, रा.धरणगाव) असे या ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी मजूर महिलांना एका वाहनातून शेतात नेण्यात येत होते. बाजार समितीच्या पुढे एका ठिकाणी हे वाहन अचानक उलटले.
यात निनाबाई महाजन, सुमन महाजन, माधुरी महाजन, जिजाबाई महाजन, स्वाती महाजन, ढगूबाई महाजन, महेंद्र पाटील हे जखमी आहेत. यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जळगाव येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.