फैजपूर : शहरात दोन वेगवेगळ्या घटनेप्रकरणी परस्परविरोधी तक्रार फैजपूर पोलिसात दाखल करण्यात आला. 30 वर्षीय महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल झाला तर दुसर्या गटातर्फे विनयभंगाचा आरोप करणार्या महिलेसह अन्य तीन महिलांनी सेवानिवृत्त उपअधीक्षकांना कटात सहभागी करून घेत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल करून घेत तपासाला वेग दिला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक नसल्याचे सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी सांगितले.
महिलेचा विनयभंग करीत जातीवाचक शिवीगाळ
शहरातील एका भागात 30 वर्षीय महिला वास्तव्यास असून 4 रोजी सायंकाळी सहा वाजता संशयीत आरोपी शेख शकील शेख दगू (मिल्लत नगर, फैजपूर) याने तक्रारदाराकडे पाहून आपल्या तक्रारदाराला धमकावते, असे म्हणत सार्वजनिक जागी अश्लील जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा आरोप आहे.
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न : सेवानिवृत्त उपअधीक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा
दुसर्या गटातर्फे सेवानिवृत्त पेन्शनर शेख शकील शेख दगू (65, मिल्लत नगर, फैजपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत 30 वर्षीय महिला आरोपीसह तीन महिला व 20 वर्षीय मुलगा (पूर्ण) नाव माहित नाही यांनी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्याशी कट कारस्थान मिळून 4 ऑक्टोबर रोजी फैजपूरातील ईदगाह मैदानाजवळ तसेच फैजपूर पोलीस ठाण्याच्या आवारात शेख शकील यांना शिवीगाळ केली तर अन्य तीन संशयीतांनी तोंडात विषारी औषध टाकण्याचा प्रयत्न करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच खिशातील 20 हजारांची रोकड हिसकावली तसेच पोलीस ठाण्यात आल्यानंतरही शिविगाळ केल्याचा आरोप आहे.