जळगाव संदश न्युज नेटवर्क
चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील वडगावसिम येथील शेतकरी अरुण भिका बाविस्कर यांच्या शेतात केळीच्या झाडाला आलेल्या एका घडाला चक्क तीन कंबळफुले आल्याने हा विषय परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कुतूहलाचा ठरत आहे.अरुण बाविस्कर हे कायम केळीची लागवड करीत असतात. केळी निसवणीच्या वेळेस ते सपत्नीक केळी झाडाची खणानारळाची ओटी भरून विधीवत पुजाही करतात.परंतु ह्या वर्षीच्या केळी निसवणीत त्यांना एका घडाला तीन कमळफुले आल्याचे दिसले.त्यांनी आपल्या शेजारील शेतकऱ्यांना हा विषय सांगितला असता घडाला आलेले तीन कमळफुले पाहिल्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त करून हा निसर्गाचा चमत्कार आहे असेही सांगितले.
अरुण बाविस्कर हे श्री भवानीदेवी,श्री रेणुकादेवी व श्री मरीआई देवीची मनोभावे पूजाआरती करतात.ते अध्यात्मिक,धार्मिक, सामाजिक कार्यात मोफत स्वयंपाकीचे कामही करतात.त्यांच्या शेतात केळीला आलेले तीन कमळफुले हे तीन देवींची आराधना करण्याचेच फळ आहे,असेही ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. याप्रसंगी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी अरुण बाविस्कर यांचेसह पुर्ण परिवाराचे अभिनंदन व कौतुक केले आहे.