प्रतिनिधी ( जितेंद्र काटे ) -भुसावळ – येथून जवळच असलेल्या साकेगाव येथील जिल्हा परिषदेच्या ऊर्दू शाळेत चोरी झाल्याची घटना घडली असून
भुसावळ तालुका पोस्टे भाग ०५ सीसीटिएनएस गु.र.न. २०२/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२) ,३२४(४)(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत फिर्यादीः- श्रीमती शबनम रहीमोद्दीन देशमुख वय-५२ वर्षे धंदा-शिक्षक जि.प.केंद्र शाळा साकेगाव रा.बजरंग कॉलनी खडका रोड भुसावळ ता.भुसावळ यांनी दिली असून दि.१९/९/२०२४ रोजी चे सायंकाळी ५ वा.ते दि.२०/९/२०२४ रोजीचे दुपारी१:३० वा.चे दरम्यान जिल्हा परीषद समुह साधन केंद्र साकेगाव तालुका भुसावळ येथून
चोरीस गेलेला माल – १८०००/-रु.की.चे एकुण ०६ नग सौरउर्जेच्या पँनल २.० कि.वँट असलेले वरील वर्णनाच्या व किंमतीच्या जि.प.शाळेच्या समुहकेंद्रावर स्लँप च्या वर लावलेल्या सौरसंच पँनल (प्लेटा)कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमती वाचुन लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले आहे. म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ वाल्मिक सोनवणे करीत आहेत.