प्रतिनिधी ( जितेंद्र काटे ) – भुसावळ – येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथील किराणा दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप तोडून व सीसीटीव्ही कॅमेरा वाकवून चोरट्यांनी दुकानातील माल रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला आहे या बाबत भुसावळ तालुका पोस्टे सीसीटीएनएस गुरनं- २०१/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम३०५(अ),३३१(४),३२४(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी आक्रोश संजय शिंदे वय २८ व्यवसाय व्यापार रा.कु-हे पानाचे ,शिवाजीनगर ता भुसावळ जि.जळगाव असून सदरची घटना १९/९/२०२४ रोजी रात्री १०:३० वा.ते दिनांक.२०/९/२०२४सकाळी ८ वा.च्या दरम्यान बालाजी सुपर शाँप कुऱ्हा पानाचे ता भुसावळ येथे घडली आहे या घटनेत चोरीस गेलेला माल – ६९००/- रुपये किमतीचे पँराशुट आँईल,पाँऩ्डस पावडर,वाईल्ड स्टोन पावडर,हिमालया फेस वाँश,फाँग सेट,विको टरमरीक,फेअऱवली फेशवाँश,डाबर अनमोल आँईल,नवरत्न कुल आँईल,बोरो प्लस असा किराणा दुकानातील सामान तसेच १२०००/-रुपये नगदी रुपये आणि २०००/-रुपये किमंतीचा कँमेरा डि.व्ही.आर..एकुण – २०९००/-रुपये फिर्यादी यांच्या मालकीची वरील वर्णनाचा व किमंतीचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यानी फिर्य़ादीच्या दुकानाचे शटरचे कुलप तोडुन अनाधिकृतपणे दुकानात प्रवेश करुन फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला म्हणून गुन्हा दाखल आहे.पुढीलत पास पो नि महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. युनूस शेख करीत आहेत.