अमळनेर -: शौचास गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा काटेरी झुडुपात खून झाल्याची घटना अमळनेरच्या गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीजवळ समोर आली. दरम्यान अनुकंपावर नगरपालिकेत आपल्याला नोकरी लागावी यासाठी नणंदने प्रियकराच्या मदतीने वहिनीला जीवे मारल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगावच्या अमळनेर शहरात हि धक्कादायक घटना घडली आहे. अमळनेरच्या गांधलीपुरा परिसरात वास्तव्यास असलेल्या पारोबाई घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मंगला घोगले व सून शीतल जय घोगले या दोघी २२ सप्टेंबरला सकाळी शौचास गेल्या होत्या. दरम्यान मुलगी मंगला ही दहा ते १५ मिनिटांत परत आली. परंतु, सुनबाई परत का आली नाही, म्हणून विचारले असता, कोरडी लाकडे घेऊन येते, असे सांगून मला पुढे पाठवले असल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर मुलगी मंगला ही गांधलीपुरा परिसरातून मटण घेऊन परत आली. तरी देखील सून परत आली नाही, म्हणून सर्वजण तिला शोधायला काटेरी झुडुपात गेले असता, शीतल रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिच्या हातावर व डोक्यावर वार केलेले दिसत होते. तिला दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्रियकराच्या मदतीने काढला काटा
घटनेतील मृत शीतल यांच्या सासू पारूबाई घोगले या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत. त्यांचा मुलगा जय हा आजारी राहत असल्याने त्यांच्या जागेवर सून शीतल लागेल. परंतु आपल्या वाहिनी ऐवजी आपण कामाला लागावे असे मुलगी मंगला हिला वाट असल्याने तिने प्रियकराच्या मदतीने वाहिनी शीतल हीच खून केल्याचे (Police) पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगला हिच्याशी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.