चोपडा महाविद्यालयात घटस्थापनेच्या निमित्ताने ग्रंथपूजन कार्यक्रमाचे आयोजण डाॕ.स्मिता पाटील यांच्या हस्ते ग्रंथपूजन

0
44

हेमकांत गायकवाड

चोपडा : येथील महाविद्यालयात घटस्थापनेच्या निमित्ताने ग्रंथपूजन कार्यक्रमाचे आयोजण डाॕ.स्मिता पाटील यांच्या हस्ते ग्रंथपूजन  चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे घटस्थापनेनिमित्त ग्रंथपूजन व सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी संस्थेच्या सचिव डाॕ. स्मिता संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते सरस्वती व ग्रंथपूजन करण्यातआले.याप्रसंगी सचिव डाॕ. स्मिता संदीप पाटील , प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डाॕ ए एल चौधरी , उपप्राचार्य प्रा डाॕ व्ही टी पाटील, उपप्राचार्य प्रा एन एस कोल्हे, उपप्राचार्य डाॕ के एन सोनवणे,ज्यु.काॕलेज उपप्राचार्य प्रा. बी एस हळपे , पर्यवेक्षक प्रा.एस पी पाटील, रजिस्ट्रार डी एम पाटील तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस एस बोरसे, पी जे बेहरे , शशिकांत चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love