सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकाऱ्यास मारहाण! आमदार येऊन गेले अन्‌ कंत्राटदाराकडून मारहाण

0
39

जळगाव – जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्यास मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (ता. २६) समोर आली. कंत्राटदाराच्या बिल काढण्यावरून ही मारहाण झाल्याची चर्चा असून, संबंधित विभागात संपर्क केला असता, कोणीही माहिती देण्यास तयार नसल्याने नेहमीप्रमाणे या प्रकरणी गुन्हा नोंदविला जाण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदार, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अधिकारी, अभियंता व कर्मचाऱ्यांना सतत मारहाण होत असल्याचे दिसून येते. सहा महिन्यांपूर्वी एका आमदारपुत्रासह त्याचा मित्र कार्यालयात रस्त्यांच्या कंत्राट निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कार्यालयात आला होता.

काही स्थानिक गुंडाच्या टोळक्याने त्यांना घेरून पिस्तुलीचा धाक दाखवत मारहाण केली होती. सोबतच संबंधित अधिकाऱ्यास शिवीगाळ व दमदाटी केली होती. घटना घडल्यानंतर तत्काळ जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात अधिकारी दाखल झाले. मात्र, अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही.

Spread the love