कडगावला धावत्या डंपरवर दगड भिरकावून रोकड लंपास; ‘फोन-पे’वरही घेतले पैसे

0
144

जळगाव -: धावत्या डंपरच्या काचेवर दगड फेकून वाहन अडवून चालकाला मारहाण करीत खिशातून रोकड हिसकावली, तसेच जिवे मारण्याचा धाक दाखवून ‘फोन-पे’वर पाच हजार रुपये स्वीकारून लूट केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील भातखंडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर चिंधू सोनवणे (वय २९) खासगी डंपरवर चालक म्हणून काम करतात.

सोमवारी (ता. ७) त्यांच्या ताब्यातील डंपर (एमएच १९, झेड २८५२) घेऊन नशिराबाद शिवारातील कडगाव रोडने जात असताना रात्री साडेनऊच्या सुमारास एका तरुणाने त्यांच्या वाहनाच्या काचेवर दगड फेकून मारल्याने त्यांनी वाहन जागीच थांबविले. दगड मारणाऱ्याने शिवीगाळ करीत दमदाटी करून त्यांच्या खिशातील २ हजार ७०० रुपये रोख हिसकावून घेतले.

तसेच फोन-पेवरून पाच हजार रुपये त्याच्या नंबरवर टाकायला भाग पाडले. एकूण सात हजार ७०० रुपये लंपास करून मारहाण करीत चोरटे पसार झाले. या प्रकरणी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन संशयित कमलाकर सपकाळे आणि त्याचा साथीदार राजेंद्र सोनवणे अशा दोघांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात जबरीलुटीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करीत आहेत.

Spread the love