नवरात्रीचे शेवटचे तिन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराला परवानगी आदेश जारी

0
144

जळगाव -: सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सुरु आहे. नवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी गरबा, दांडीया सांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास प्रशासनाने परवानगी देण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढला आहे.

१०,११, १२ ऑक्टोबर असे तीन दिवस लाऊडस्पीकर लावण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक प्रसिद्ध करत आदेश जारी केले आहेत.

ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 चे नियम 53 नुसार संपूर्ण जळगाव जिल्हयात नवरात्री उत्सवाकरीता दिनांक १०,११, १२ ऑक्टोबर या दिवशी रात्री १० ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देण्यात आली आहे. यासोबतच दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.

Spread the love