डंपर व पिकअप अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी.

0
42

(कुऱ्हा पानाचे – मोंढाळा रस्त्यावरील घटना)

प्रतिनिधी -: जितेंद्र काटे

भुसावळ – येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे – मोंढाळा या राज्य मार्गावर डंपर आणि पिक अप वाहनाचा अपघात घडला असता एकाचा मृत्यू आणि दोन इसम जखमी झाल्याची घटना घडली.

या बाबत भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , दि.१७ आँक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास कुऱ्हा पानाचे ते मोंढाळा गावा दरम्यान विजय कोळी यांच्या शेता समोर पिक अप क्रमांक एम एच १९ सी वाय ८०४९ व डंपर क्रमांक एम एच १९ झेड ३९४३ यांचा अपघात होऊन यात पिक अप चालक भावसिंग रामदास पवार रा.धानोरी ता. बोदवड हा मयत झाला असून त्याच्या सोबत असलेले प्रविण संजय जाधव ,अजय आनंदा बेलदार हे गंभीर जखमी झाले आहेत या बाबत ईश्वर संजू जाधव यांनी फिर्याद दिली असून भुसावळ तालुका पोलीसात गु.र.नं.२२५/२०२४ बीएनएस कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४) एम.व्ही अँक्ट कलम – १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि नंदकुमार काळे करीत आहेत.

Spread the love