एकनाथराव खडसे यांची मोठी खेडी ; गिरीश महाजनांसमोर मोठे आव्हाण

0
70

जामनेर -: भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळख असलेले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात समजले जाणारे, कधीकाळी पक्षात असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी पंगा घेणारे गिरीश महाजन यांना पुन्हा भाजपने जामनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे.

काँग्रेसच्या गड असलेल्या या मतदार संघात गिरीश महाजन यांनी 1995 मध्ये पहिल्यांदा कमळ फुलवला. त्यानंतर मतदार संघात त्यांच्या गुर्जर समाजाची संख्या कमी असताना केवळ लोकांशी असलेल्या थेट जनसंपर्कामुळे गिरीश महाजन सलग सहा वेळा आमदार झाले. परंतु सातव्यांदा आमदार होणे त्यांच्यासाठी सोपे नाही. मतदार संघातील गणिते बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. त्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये गिरीश महाजन यांच्यासोबत काम करणारे मराठा समाजाचे दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. आता महाविकास आघाडीचे ते उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक आता एकतर्फी नाही तर रंगतदार होणार आहे.

असा आहे जामनेर मतदार संघ

जामनेर मतदारसंघ हा ग्रामीण मतदार संघ आहे. या भागातील लोकांचा शेती हा मूळ व्यवसाय आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात जामनेर विधानसभा मतदार संघ येतो. 2011च्या जनगणनेनुसार जामनेर मतदार संघात 26,318 एससी मतदार आहेत. 33,487 एसटी मतदार आहेत. 39,104 मुस्लिम मतदार आहेत. ग्रामीण मतदारांची संख्या 2,73,295 आहे. शहरी मतदार 37,087 आहेत. म्हणजे जामनेर मतदार संघात ग्रामीण भागाचे वर्चस्व आहे. . 2011च्या जनगणनेनुसार जामनेर तालुक्यात 60 हजारांच्या जवळपास मराठा समाजाची लोकसंख्या आहे. त्याखालोखाल बंजारा, माळी, मुस्लीम तसेच मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या आहे. गिरीश महाजन हे गुर्जर समाजाचे आहेत. जामनेर तालुक्‍यात गुर्जर समाजाची लोकसंख्या केवळ आठ ते दहा हजार इतकी आहे.

वर्ष उमेदवार पक्ष मते

2019 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 114714

2014 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 103498

2009 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 89040

2004 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 71813

1999 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 56416

1995 गिरीश दत्तात्रय महाजन भाजप 63661

1990 दत्तात्रय उघाडू महाजन काँग्रेस 31531

1985 बाबूसिंग डागडूसिंग राठोड काँग्रेस 29964

1980 ईश्वरलाल शंकरलाल जैन काँग्रेस (यू) 31068

1978 गजाननराव रघुनाथराव गरुड अपक्ष 15955

1972 नारायण किसन पाटील अपक्ष 26340

1967 अबाजी नाना पाटील

1972 अबाजी नाना पाटील

Spread the love