शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट मिळताच गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

0
36

जळगाव – : ग्रामीण मतदारसंघाचे ग्रामीण आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षाकडून देण्यात आलेल्या उमेदवारीनंतर आभार व्यक्त केलेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विश्वास ठेवून विधानसभेची उमेदवारी मला दिली आहे. उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. उद्या सकाळी ९ वाजता मी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तर मी जनतेशी ठेवलेला संपर्क, केलेली कामं आणि सरकारच्या माध्यमातून केलेली कामं त्यातून जनतेचा मिळालेला आशीर्वाद यावर ही विधानसभा निवडणूक लढवत आहे. मला खात्री आहे जनता मला नक्की आशीर्वाद देईल, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Spread the love