सध्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. राजकीय क्षेत्रात हालचाली वाढल्या असून गाठीभेटी पक्षानंतर, उमेदवार येत आहे. अश्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली.
आणि या दोघामंध्ये २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे देखील उपस्थित होते. ही भेट अंतरवाली सराटी यांच्या सरपंचाच्या घरी झाली. उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालं आहे. मनोज जरांगे यांनी असं म्हंटल आहे की सर्व पक्षांच्या याद्या, उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आपले निर्णय, उमेदवार जाहीर करू, आणि त्याचबरोबर त्यांनी उमेदवारांची चाचणी देखील सुरु केली आहे. या दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यामुळे अनेक चर्चेला उधाण आलं आहे. या दोघांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली असेल याबाबत उत्सुकता आहे. मंत्री उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत.