पातोंडीत बंद घर फोडले : साडेसात हजारांचे साहित्य लंपास, गुन्हा दाखल

0
16

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

रावेर : तालुक्यातील पातोंडी येथे बंद घरातून दोघांनी साडेसात हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पातोंडीत ज्ञानेश्वर बाबुराव ठाकणे (53) यांचे घर असून ते सध्या व्यावसायानिमित्त ठाणे येथे स्थायीक झालेले आहेत. शुक्रवार, 8 ऑक्टोंबर दुपारी ादेन वाजेच्या पूर्वी संशयीत आरोपी मधुकर गोंडू इंगळे आणि पंडित चुडामण ठाकणे (पातोंडी, ता.रावेर) यांनी संगनमताने ज्ञानेश्वर ठाकणे यांच्या घरातील टीव्ही, फॅन, चार लोखंडी पत्रे, दोन क्विंटल गहू आणि लोखंडी स्टूल असा एकूण साडेसात हजार रुपये किंमतीचे साहित्य लांबवले. या प्रकरणी ज्ञानेश्वर ठाकणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात मधुकर इंगळे व पंडित ठाकणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र राठोड करीत आहेत.

Spread the love