विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच रंगतदार झाले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
राज्यातील अनेक महत्वाच्या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याठिकाणी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. कोकणातील दापोली विधानसभा मतदारसंघ यापैकी एक आहे. यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार लढत होणार आहे. रत्नागिरीतील ३ मतदारसंघामध्ये एकाच नावाचे एक-दोन नाही तर तब्बल तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन-तीन उमेदवार निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असलेले दोन संजय कदम अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या योगेश रामदास कदम यांच्या नावाचे साधर्म्य असलेले दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकाच नावाच्या व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटातील एकाच नावाचे उमेदवार –
संजय वसंत कदम (शिवसेना ठाकरे गट)
संजय संभाजी कदम(अपक्ष)
संजय सिताराम कदम (अपक्ष)
शिवसेना शिंदे गटातील एकाच नावाचे उमेदवार –
योगेश रामदास कदम (शिवसेना शिंदे गट)
योगेश रामदास कदम (अपक्ष)
योगेश विठ्ठल कदम (अपक्ष)
चिपळूण मतदारसंघातील एकाच नावाचे उमेदवार –
शेखर गोविंदराव निकम
प्रशांत बबन यादव
प्रशांत भगवान यादव