जळगाव संदेश न्यूज नेटवर्क
जळगाव – : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असतांना जळगाव मध्ये जळगाव शहर विधानसभा मतदार संघात भाजपात झालेले बंड रोखण्यात अपयश आले असून भाजपाचे बंडखोर उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
महायुतीचे बंडखोरांना माघारी घेण्यासाठी राजी करण्याचे मोठे आव्हान होते मात्र भाजपाचे अश्विन सोनवणे यांना राजी करण्यात भाजपाला मोठं अपयश आलं आहे.जळगाव शहर मतदार संघातून महायुतीने भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे(राजुमामा) यांना अधिकृत उमेदवारी दिली असून भाजपाचे अश्विन सोनवणे यांनी बंड करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
जळगाव विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून संधी मिळण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर पक्षाशी बंडखोरी केलेले उमेदवारांना शांत करण्याचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. अश्विन सोनवणे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात असतील हे निश्चित आहे.