जळगाव संदेश न्युज नेटर्वक
जळगाव -: शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरातील महर्षि वाल्मीक मंदिर,पक्की चाळ, महर्षि वाल्मीक नगर, तानाजी मालसुरे नगर, मेस्को माता नगर, दिनकर नगर, मोहन टॉकी, कांचन नगर, घुले प्लॉट परिसर दालफड, शनीपेठ, रिधुरवाडा या परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला.
.या परिसरातील अनेक ठिकाणी असलेल्या धार्मिक मंदिरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी दर्शन घेत आपल्या विजयाची प्रार्थना देखील केली. या प्रसंगी डॉ.अश्विन सोनवणे यांना लाडक्या बहिणींनी ओवाळत ज्येष्ठ नागरिकांनी विजयासाठी आशीर्वाद देखील दिले. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे याना अनेक समस्या देखील बोलून दाखविल्या.
याप्रसंगी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे,शैलेंद्र सोनवणे, विशाल सोनवणे, प्रकाश अण्णा सोनवणे, रतिलाल सपकाळे, पंकज सपकाळे, कैलास सोनवणे, मनोज सोनवणे, किरण सैंदाणे, विलास सोनवणे, राहुल ठाकरे(मोगली बाबा), मंगला सोनवणे, अर्जुन सोनवणे, शेरा सोनवणे, संगीताताई कोळी,जित सोनवने, सूर्या सोनवणे, शिवम सोनवणे, भाविक सोनवणे, रतन कोळी, कैलास सोनवणे, आकाश पारधे, राहुल मिस्त्री, धीरज धनगर, बबलू कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थिती होते.