प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील तत्कालिन प्रकाश हायस्कूल च्या इयत्ता १० वी च्या १९९६ च्या बँच च्या विद्यार्थ्यानी नुकतेच अंजनातील महादेव मंदिर येथे गेट – टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आई वडील व सासू सासरे तसेच मुलाबाळांना सुध्दा आमंत्रित करण्यात आले होते.
गेट – टुगेदर च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन आयुष्यभर मदत करण्याचे आश्वासन दिले.