धामणगाव, नांद्रा खु., विदगाव, खापरखेडा व परिसरात धनुष्यबाणाचा एकच नारा
जळगाव, 9 नोव्हेंबर – “महायुती सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भागातील महिलांना सक्षमीकरण, शाश्वत रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत अनेक फायदे मिळाले आहेत. याशिवाय, गुलाबभाऊ पाटील यांनी तालुक्यातील मूलभूत सुविधांचा विकास केला आहे. “गुलाब भाऊंनी गावागावांतून केलेल्या विकास कामांचे प्रत्येकाला ज्ञात आहे. त्यांनी महिलांच्या. आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजनांचा अमल केला असल्याने महिलांनी गुलाबभाऊच्या “धनुष्यबाणाला” विजयासाठी एकत्र येऊन ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन धामणगाव, नांद्रा खु., विदगाव , खापरखेडा परिसरात प्रचारा दरम्यान ग्रामस्थ व महिलांशी संवाद साधताना पं. स. माजी सभापती ललिताताई कोळी यांनी केले आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जनाआप्पा कोळी, अनिल मंडोरे, जाती जमाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू सोनवणे, लखीचंद उर्फ बाळू कोळी, शिवाभाऊ सपकाळे, शिवाजी सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, गणेश भालेराव, वसंत सपकाळे, राजू सपकाळे, डॉ. प्रदीप भालेराव, पंढरीनाथ भालेराव, पुंडलिक पाटील, सोपान पाटील, प्रल्हाद पाटील, समाधान सपकाळे, रघुनाथ महाजन, वासुदेव सोनावणे , योगेश सपकाळे, विदगाव सरपंच राजेंद्र कोळी, आवार सरपंच सुनील सपकाळे, धामणगाव सरपंच निशिगंधा सपकाळे, तुरखेडा सरपंच नितीन सपकाळे, रमेश सोनवणे, दीपक सोनवणे, रवींद्र सोनवणे, , संजय भालेराव, सुरेश भालेराव, रवींद्र सोनावणे, चिंधू सपकाळे, गोकुळ सपकाळे, यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.