जळगाव संदेश न्युज नेटर्वक
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत. ’ व्होरा कमिटीचा रिपोर्ट समोर का आला नाही, त्याबाबत अनेक खुलासे समोर आले असते. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत की नाहीत याबाबत अधिक माहिती घ्यावयाची असल्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून घ्यावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते.
राहुल गांधी महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या सभेमध्ये लाल रंगाचे संविधान दाखवत भाषण केले आहे. लाल रंगाच्या संविधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताच आता राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणीचा खेळ रंगला आहे. यातच प्रकाश आंबेडकरांनीही आता देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले आहे. ‘संविधानाचा मूळ रंग काय आहे ते फडणवीसांनी सांगावे,’ असे आंबेडकर म्हणाले.
मुंबईतील मराठी लोकसंख्या कमी होण्यामागे मुख्य म्हणजे शिवसेना कारणीभूत आहे. कारण मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता अनेक वर्षांपासून आहे. मुंबई महानगरपालिकेत अनेक काँन्ट्रॅक्टर हे बिगर मराठी आहेत. मुंबईतील मोठी मोठी कामे परराज्यातील ठेकेदारांना दिल्यामुळे आपोआप स्थायिक झाले आणि मुंबईतील मराठी व्यक्ती कमी होत गेला. मी स्वतः मुंबईकर आहे, याला मी साक्षीदार आहे, अशी माहिती देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.