सर्वच पक्षांसाठी जळगाव महत्त्वाचे! मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, संजय राऊत मुक्कामी

0
37

जळगाव : विधानसभेच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा रविवारी पार पडली. तर सोमवार, ११ रोजी उद्धव ठाकरे व शरद पवार यांची सभा पार पडणार आहे. या रणधुमाळीत दिग्गज नेत्यांचा मुक्काम मात्र जळगावात राहणार आहे. त्यामुळे बड्या नेत्यांसाठी जळगाव का महत्वाचे..? याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

सोमवारी शरद पवार यांच्या चार सभा जळगाव जिल्ह्यात होणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्याही दोन सभा होणार आहेत. शरद पवार यांच्या सभा झाल्यानंतर ते सोमवारी रात्री जळगाव शहरात मुक्कामी थांबणार आहेत. जैन हिल्स येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. तर १२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मुक्कामी थांबणार आहेत. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांचाही आगामी आठवड्यात जळगावात मुक्काम राहणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जळगावमधील ११ जागांसाठी चांगले प्रयत्न केले जात आहेत.

जळगाव जिल्हा का महत्वाचा? 

उद्धव सेना 

फुटीनंतर जिल्ह्यातील पाच आमदार शिंदेसेनेकडे गेल्यामुळे उद्भव सेनेला मोठा धक्का बसला होता. जिल्ह्यातील पाचही आमदार नसल्यामुळे संघटनेवरही परिणाम झाला. या निवडणुकीत उद्धव सेना चार जागा लढवित असून, उद्धव ठाकरेंच्या दोन सभा जिल्ह्यात आहेत. यासह आदित्य ठाकरेंचीही निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या काळात पाचोरा येथे एक सभा झाली. उध्ववसेनेसाठी यावेळची ही निवडणूक म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे.

शिंदेसेना

शिवसेनेत फुट पडल्यानंतर जिल्ह्यातील ५ आमदार हे शिंदेसेनेत गेले. फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. फुटीनंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यात अनेक सभा घेऊन, शिंदेसेनेच्या आमदारांना टार्गेट केले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जळगाव जिल्ह्याचे सर्वाधिक दौरे करून, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. तोच दबाव कायम राखत उध्दवसेनेला झाकोळून टाकण्याची शिंदेसेनेला ही संधी आहे.

भारतीय जनता पक्ष 

लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत अमळनेर, रावेर, मुक्ताईनगरात भाजपचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत यापैकी मुक्ताईनगर, अमळनेरची जागा भाजपने मित्र पक्षाला दिल्या आहेत. भाजप यंदाच्या निवडणुकीत २०१९ च्या तुलनेत दोन जागा कमी लढत आहे. मात्र, ज्या पाच जागांवर भाजप उमेदवार रिंगणात आहेत. त्या जागांवरील विजय भाजपसाठी महत्वाचा आहे. २०१४ मध्ये भाजपचे ६ आमदार जिल्ह्यात होते. तर २०१९ मध्ये ही संख्या ४ वर आली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत १०० टक्के यश मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

अजित पवार गट 

जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटाच्या वाट्याला अमळनेरची एकमेव जागा आली आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रचारासाठी अमळनेरमध्ये सभेचे नियोजन सुरू आहे.

काँग्रेस

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने केवळ १ जागा लढविली होती. त्यात ती जागा जिंकून कॉग्रेसने १०० चा स्ट्राईक रेट ठेवला. तर यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत तीन पक्ष असतानाही, जागा वाटपात आपल्याकडे ३ जागा खेचत काँग्रेसने बाजी मारली आहे. आता जागा वाटपात मारलेली बाजी विधानसभेच्या रिंगणातही मारली जाते का..? याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गट 

 

Spread the love