शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्….

0
28

सातारा -: शरद पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातली जनता अजूनही विसरलेली नाही. त्याच सभेची आठवण आज इचलकरंजीकरांना झाली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवारांचे भाषण सुरु होताच पावसालाही सुरुवात झाली, शरद पवारांनी पावसातच आपलं भाषण सुरु ठेवलं.

ते म्हणाले की अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. यावर कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवून घोषणा दिल्या.

महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी इचलकरंजीत शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होते. मात्र पवार भाषणाला उभे राहतात पावसाला सुरुवात झाली तरीरी त्यांनी आपले भाषण सुरु ठेवले.

 

Spread the love