ऑनलाईन ई पिकपेरा न लावणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ? जगन्नाथ बाविस्कर यांचा सुचक सवाल..

0
34

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

             

चोपडा-प्रतिनिधी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या ७/१२ उतार्यावर ऑनलाईन पद्धतीने ई पिक पेरा लावलेला नाही,अशा शेतकऱ्यांसाठी शासन प्रशासनाची काय उपाययोजना राहणार आहे ? असा समयसूचक सवाल चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये उपस्थित केला आहे.

याआधी शेतकऱ्यांना विमा,कर्ज आदींचा लाभ मिळावा म्हणून उताऱ्यावर सोयीनुसार बदल केला जात होता.याबाबत शासनाने दि.१५ ऑगस्ट २०२१ पासुन योग्य तोच पिकपेरा लावणेसाठीच्या सूचना दिलेल्या आहेत.यासाठी तहसिल कार्यालय व क्रुषि विभागातर्फे बांधावर जाऊन प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे.त्याची मुदत दि.१४ ऑक्टोबर पर्यंतच असून अजूनही ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या उताऱ्यावर पिकपेरा लावलेला नाही.कारण त्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ते ऑनलाईन ई पिकपेरा लावूच शकत नाही.यासाठी तहसील व क्रुषि विभागाने स्थानिक स्वयंसेवकांना योग्य ते मानधन देऊन उर्वरित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर ऑनलाईन ई पीकपेरा लावणे बाबतची उपाययोजना करून मुदतही वाढविणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांनी सुद्धा तलाठी कार्यालयात जाऊन आपल्या उताऱ्यावर ई पिकपेरा नोंदणीसाठी प्रयत्न करावेत,असेहीआवाहन गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.

Spread the love