Jalgaon sandesh news network
जळगाव – शहरातील राजमालती नगरामध्ये आपापसातील जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आले आहेत.
सिद्धार्थ माणिक वानखेडे वय ३६ राहणार राज मालती नगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राज मालती परिसरामध्ये जुन्या वादातून दोन गटात तू पण हाणामारी झाल्याची घटना बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे वय -३६ रा. राजमालती नगर यांच्या छातीवर आठ ते दहा जणांनी बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. तर यामध्ये विशाल अजय सुरवाडे वय-२८, जानू संजू पाटील वय-२०, फैजन राजू पाटील वय-२४ आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल वय-४२ सर्व रा. राजमालती नगर हे सर्व जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणातील ७ ते ८जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू