15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. परकीय इंग्रज जाऊन स्वकीय भारतीयांचे शासन आले. परंतु राज्यसकट हाकलण्यासाठी नियमावली किंवा आचारसंहिता असणे आवश्यक होते. त्यासाठी संविधान समितीचे गठन करण्यात येऊन त्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्या अंतर्गत अनेक उपसमिती नेमण्यात आल्या. त्यापैकी संविधान मसुदा समिती नियुक्त करण्यात आली. त्यात एकूण सात सदस्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. या समितीतील सदस्य या ना त्या निमित्ताने हजर राहत नव्हते. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे शेवटी फक्त एकटे डॉक्टर बाबासाहेबच समितीचे सर्वेसर्वा राहिले. त्यांनी आपल्या शरीर प्रकृतीची पर्वा न करत दोन वर्षे 11 महिने आणि 17 दिवस एवढ्या अवधीत 395 कलमे आणि आठ परिशिष्टे लिहून ते एकट्यानेच पूर्ण केले. हे टी टी कृष्णाम्मच्चारी व डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या वक्तव्याने सिद्ध झालेले आहे. तो इतिहास अजूनही ताजाच आहे आणि तो शेवटपर्यंत राहणारच आहे. हे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्राला अर्पण करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले त्याच दिवशी त्यातील कलम 394 प्रमाणे कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 380, 388, 392, 393, 394 ही कलमे अमलात आली.
त्यानंतर उर्वरित कलमे 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. संविधानाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे की, आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. संविधान अंगीकृत करून स्वतः प्रत अर्पण केल्यामुळे या संविधानाशी प्रत्येक भारतीय नागरिकाचे नाते जुळलेले आहे. त्याचे संरक्षण करणे आणि त्याप्रमाणे आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न करणे तसेच आपल्या कर्तव्यासही जागणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला मान आणि सन्मान आपल्या संविधानाने दिलेला आहे. सर्व जगात आपले संविधान हे उच्च दर्जाचे आणि महान ठरले आहे. आज पर्यंत भारताने राजकीय दृष्ट्या अनेक चढउतार पाहिले. एक पक्षीय सत्ता पाहिली. आघाडी किंवा युतीची सत्ता पहिली. चीन तसेच पाकिस्तान बरोबरचे युद्ध पाहिले. समाजात अनेक मतमतांतरे असताना अनेक धर्म अनेक समाज असताना अनेकतेत ऐकता अनुभवली. तसेच एकतेत अनेकताही अनुभवली. तरीही संकट समयी सारा भारत एक होतो याचे कारण भारतीय संविधानात असून ते संविधान जागतिक कीर्तीचे कायदे तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे. संविधानाप्रमाणे आपली शासन व्यवस्था कार्यरत आहे. ते सर्वचजण जाहीरपणे मान्य करता. महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान सन्मानदिन म्हणून पाडावा असे 2008 साली परिपत्रक काढले आहे. सर्वांनीच आपल्या संविधानाचा सन्मा केला पाहिजे. वैचारिक मतभेद असू शकतात पण संविधान हे सर्वांचे सर्वांसाठीच आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. संविधानामुळेच आपण सुरक्षित आहोत. भारतीय म्हणूनच त्याचे संरक्षण केले पाहिजे. हम सब एक है, आम्ही भारतीय आहो. आम्ही भारताचे लोक आहोत आणि संविधान आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे.
पो. ना. विनोद अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव 9823136399
लेखक महाराष्ट्र पोलीस दलातील साहित्यिक कवी आहेत.