जळगाव जिल्हा हा राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील अकराही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विजय झालेला आहे. राज्यातील घडामोडी बघता मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे माजी मुख्यमंत्री व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष श्रेष्ठींच्या भूमिकेत असणार असल्याचे माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्याची वर्णी लागू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे.
जळगाव जिल्ह्याचे राजकारण व राज्याचे राजकारण यांच्यामध्ये मोठे राजकीय समीकरण हे स्वातंत्र्य काळापासून सुरू आहे. राजकीय वर्तुळात जळगाव जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या भागातील नेत्यांनी नेहमीच आपापल्या पदाचा व आपापल्या नावाचा धबधबा राज्याच्या राजकारणात निर्माण केलेला आहे. सध्याला जळगाव जिल्ह्यातील तीन नेते यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील या तिघांनीही मंत्रीपदाची धुरा चांगल्याप्रकारे सांभाळलेली आहे. त्यामुळे आता जर राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली तर मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख्याच्या भूमिकेत राहतील व त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पद हे दुसऱ्या शिवसेनेचा निष्ठावंतकार्यकर्त्याला मिळेल. त्यामुळे हे पद जळगाव जिल्ह्याला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. खानदेशी तोफ व शिवसेनेचे भूमिका मांडण्यात शिवसेनेच्या पद्धतीने राज्यभर ओळख असणारे गुलाबराव पाटील यामुळे जळगाव जिल्ह्याला उपमुख्यमंत्री पद मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.