जळगाव -: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती निघाली असून याबाबत कंपनीकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण ५० रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी careers.ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
असिस्टंट ऑफिसर पदासाठी ही भरती होईल. एनटीपीसीमधील या भरतीमध्ये ५० मधील २२ पदे ही सामान्य प्रवर्गासाीट राखीव आहेत. तर इतर पदेआरक्षित प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
वयोमर्यादा आणि परीक्षा फी :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा सिविल प्रोडक्शनमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच इंडस्ट्रील सेफ्टीमध्येही डिप्लोमा किंवा अॅडव्हान्स डिप्लोमा केलेला असावा. याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in जायचे आहे. त्यानंतर सहायक अधिकारी (सिक्युरिटी) च्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर करावे लागणार आहे. यानंतर फॉर्म भरा. त्यानंतर फी भरा. या फॉर्मची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.