ठाकरे गटाचे आमदार फुटणार; गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

0
29

जळगाव -: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले तरी देखील अद्याप राज्यात नवं सरकार स्थापन झालं नाही. सरकार कधी स्थापन होणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार?

याबाबत सर्वांनाच प्रश्न पडले आहेत. यातच एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे गावाला गेले. त्यानंतर मुंबईतील घडामोडी अचानक संथावल्या. आज मुंबईत संध्याकाळी महायुतीची बैठक होणार असून यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. पण त्यापूर्वीच शिंदे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी बॉम्ब टाकला आहे. त्यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे.गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांनी ठाकरे गटाचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला.

मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना शेवटी भाजपचे नेतृत्वाचा हा विषय आहे. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. या 2 डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेत्याची निवड होईल. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथ ग्रहण करतील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

राज्यात एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते अचानक त्यांच्या गावी गेले आहेत. तिथे त्यांनी भेटायला आलेल्या नेत्यांना भेट नाकारली. त्यामुळे ते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बिलकुल नाराज नाही येत एकनाथ शिंदे साहेब हे असं वेगळं रसायन आहे.. नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही. फार खडतर प्रवास त्यांनी यापूर्वी केलेले आहे. अडीच वर्षांमध्ये लोकांनी त्यांना जे प्रेम दिलेला आहे त्यामुळे ते नाराज राहण्याचा प्रश्नच येत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांनी ठाकरे गटाचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला. आदित्य ठाकरे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे. आंदोलन करून आज आम्ही त्यांना मोठे केलेला आहे. नाहीतर आज ज्यांनी शिवसेनेला मोठे केले ते लोक कुठे आहेत, हे राऊत यांना विचारा असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊतांवर घणाघात

दिवाकर रावते कुठे आहेत, लीलाधर ढाके कुठे आहेत. महाडिकांच नाव कधी घेतलं जातं नाही. या सर्वांना ते विसरले आहेत. त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक वीट आहे. या सर्वांना विसरले म्हणून ते संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले, असा घणाघात त्यांनी ठाकरे यांच्यावर केला. संजय राऊत यांच्या सारख्या दगडाने त्यांच्या महालाचा संपूर्ण सत्यानाश करून टाकला. आता तरी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ओळखावे नाही तर जे उरलेले 20 आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा पाटील यांनी केला.

Spread the love