लोकप्रतिनिधी अडकला चोरीच्या गुन्ह्यात i जळगावातील घटना

0
26

जळगाव – : शहरातून धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील गिरणा नदीच्या लगत असलेल्या पंपिंग स्टेशन वरून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या इंग्रजकालीन बीडच्या जुन्या पाईपलाईन जीसीपी ने खोदून चोरी केली जात होती. त्याप्रकरणी भंगार व्यवसायिकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्याही त्यात समावेश असल्याने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गिरणा नदीलगत असलेल्या पंपिंग स्टेशनवर पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या बीडची जुनी पाईपलाईन जेसीबीने काढून चोरी केली जात होती अशी माहिती ठेकेदार सुमित सोनवणे यांनी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांना दिली. त्या ठिकाणी नरेंद्र पानगडे व रवण चव्हाण दोघे राहणार शिरसोली हे जेसीबी (क्रमांक एम हे च 32 पी 38 45) जुनी पाईपलाईन खोदून बीडचे धातूचे पाईप काढत होते. दरम्यान चौकशी करीत असताना चव्हाण यांनी तिथून पळ काढला व त्या ठिकाणी असलेल्या अक्षय अग्रवाल नामक व्यक्ती पोहोचला. ही पाईपलाईन अक्षय अग्रवाल व भावेश पाटील व अमित राठोड यांच्या सांगण्यावरून खोदली असल्याची माहिती चालक पानगळे यांनी दिली.

दरम्यान तेथून काढलेले दोन लाख 50 हजार रुपये किमतीचे सहा बिडाचे पाईप व दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे जेसीपी तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी योगेश बोरले यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नरेंद्र पानगळे, रवण चव्हाण, अक्षय अग्रवाल, भावेश पाटील, अमीन राठोड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच अटक करण्यात आलेल्या जबाबमध्ये सुनील महाजन हे नाव समोर आले. न्यायालयीन रिपोर्ट मध्ये सादर करताना सुनील वामन महाजन राहणार मेहरूण जळगाव असे टाकण्यात आले आहे. मात्र जबाबत सुनील सुपडू महाजन असे नाव असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Spread the love