प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: आयुष्य एक दिवसासाठी जगा परंतु असे जगा की आपल्या कार्याने समाजाचे प्रश्न सुटतील, आपले जिवनाला मौज मस्तीचे साधन समजता समाजाला समर्पित करा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष अशोक खैरनार यांनी केले. राष्ट्रिय मानवाधिकार व आरटीई जागरुकता संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते.
या प्रसंगी आरटीआय विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री सोमनाथ नवले ,उपाध्यक्ष रविदास बाविस्कर यांनी आरटीआय विषयी मार्गदर्शन केले. मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रिय अध्यक्ष श्री सांगेश कुमार भाटीजी यांनी हे संघटन भारतभर स्थापन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर सुकलाल पाटील जळगाव यांच्या मेहनतीने सदर मानवाधिकार संघटना सुरु आहे.गरीब, गरजू व असहाय्य लोकांना मदत तसेच मानवसेवा केली जाते. सदर संघटना कायदा आणि संविधानावर आधारीत काम शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचार निर्मूलन ,आरटीआय या विविध विषयांवर मदत करीत आहे. कार्यक्रम महासचिव श्री श्रीराम बोरसे यांच्या अपार मेहनतीने यशस्वी झाला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य संपर्क उपाध्यक्ष सुभाष शेगर, देवेंद्र देशमुख भिवंडी,जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भिकन महाजन, डाँ. राजेश महाजन ,शांताराम मोरे जामनेर, योगेश वाघ, दिपक रविंद्र ऊशीर करमाळ, डाँ.शरद पवार, राजेश चौधरी, नितीन गोयल, दत्तात्रय जैन, धिरज राजपूत व पुणे, जामनेर, ठाणे, भिवंडी,
नाशिक,जळगाव या जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.प्रास्तविक राजन नेमाडे तर आभार भिकन महाजन यांनी मानले.