राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे.
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मोठी घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत अजित पवारा यांच्यावर निशाणा साधला आहे.
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.
दिल्ली ट्रिब्युनल कोर्टने अजित पवार यांची मालमत्ता मुक्त केलेचे आदेश दिले अजित पवार यांच्यावर बेनामी संपत्ती घेतल्याचा आरोप 2021 वर्ष लावण्यात आला होता. त्यानुसार आयकर विभागाने धाडी टाकून अजित पवार पार्थ पवार आणि सुनीता पवार या तिघांचीही मालमत्ता जप्त केली होती परंतु पुरावे पुरेसे मिळाले नसल्यामुळे दिल्लीतलं ही संपूर्ण मालमत्ता मुक्त केल्याचं जाहीर केले
लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी,यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता! सन्माननीय अजित दादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार… अशी सोशल मिडिया पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे
. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट देण्यात आलीय. कर्ज वाटप, साखर कारखान्यांची विक्री यामुळे बँकेला कोणतंही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले.
सुनेत्रा पवार, अजित पवार आणि कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता १२३ कोटी ४६ लाख १७ हजार ७५८ रुपये इतकी आहे. सुनेत्रा पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे आहे. सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलीय.. तर सुनेत्रा पवार शेती आणि व्यवसाय करतात अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आलीय.. सुनेत्रा पवार यांनी त्यांची नणंद आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळेंना ३५ लाख तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाख, अजित पवार यांना ६३ लाख २० हजार रुपयांचे कर्ज दिलंय
.