”अल्ला साक्ष शपथ घेतो की…”, अजित पवारांच्या आमदाराने घेतली शपथ

0
31

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सूरूवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदाराची शपथ विधी पार पडतोय. हंगामी विधानसभा अध्यक्ष काळीदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतायत.

यामध्ये एका आमदाराने संस्कृत मधून तर काही आमदारांनी अल्लांना साक्ष धरुन शपथ घेतली आहे.

महायुतीतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी ”अल्ला साक्ष…” शपथ घेतली आहे. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. आणि त्यांनी भाजपचे पुर्वाश्रमीचे नेते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे यांचा पराभव केला होता. जवळपास 12 हजार मताधिक्यांनी मुश्रीफांनी घाटगेंना पराभवाची धुळ चारली होती.

दरम्यान मुश्रीफ यांच्यापाठोपाठ सना मलिक यांनी देखील तशाचप्रकारे आमदारकीची शपथ घेतली आहे. तर भाजप आमदार गिरीश महाजन यांनी संस्कृत भाषेत आमदारकीची शपथ घेतली. या आमदारांच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी पाचव्या क्रमांकावर शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर शपथ घेतली.

विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या 78 नव्या आमदारांचा आज पहिल्यांदा शपविधी होणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपचे 33, शिवसेना एकनाथ शिंदे यांचे 14, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8, शिवसेना उद्धव ठाकरे 10, काँग्रेस 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे.

Spread the love