बाबासाहेब ६४ विषयांत पारंगत होते : जयसिंग वाघ

0
17

जळगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर्कशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, संविधान, अभियांत्रिकी यां सारख्या ६४ विषयांचा अभ्यास करून आपले आपले स्वतंत्र सिध्दांत मांडले आहेत, यातील प्रत्येक विषयात ते पारंगत होते असे महत्वपूर्ण मत कोलंबिया सारख्या विद्यापीठाने व्यक्त केले आहे अशी माहिती प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी दिली.

अजिंठा हाउसिंग सोसायटी, जळगाव येथील सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यावक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, बाबासाहेबांना अभ्यासाची प्रचंड आवड होती, ते प्रत्येक ग्रंथाचे चिकित्सकपणे अभ्यास करून स्वतःचे स्वतंत्र सिध्दांत मांडीत असत, प्रत्येक सिद्धांतास ते विविध संदर्भ देत असत, त्यांनी मांडलेले सिध्दांत आतापर्यंत कुणालाही खोडून काढता आलेले नाही. त्यांनी स्वतः दामोदर व्हॅली प्रकल्प तयार करून अभियांत्रिकी क्षेत्रातील आपली विद्वत्ता सिद्ध केलेली आहे.

अजिंठा हाउसिंग सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव वाघ यांनी बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म देवून आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत पण आपण बौद्ध धर्माचे अनुसरण पूर्णार्थाने करत नाही असे सांगून बौद्ध धर्म एक जीवनप्रणाली असल्याने आपण त्या नुसार आचरण करावे असे आवाहन केले.

ज्योती भालेराव यांनी बाबासाहेबांनी भारतातील समस्त महिलांवर अनंत उपकार केले असून त्यांच्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवित आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सपकाळे , प्रास्ताविक सचिव निलेश सैंदाणे यांनी तर आभारप्रदर्शन दिलीप सपकाळे यांनी केले.

सुरवातीस भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन आनंद कोचूरे, पी. डी. सोनवणे, डॉ. उल्हास तासखेडकर यांनी केले, त्यानंतर सामुहिकरीत्या त्रिसरण, पंचशिल ग्रहण करण्यात आले.

विजया शेजवळे, नूतन तासखेडकर यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूरज बिऱ्हाडे, दिलीप तासखेडकर, प्रवीण नन्नवरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सिंधू तायडे , कमल सोनवणे, विमल भालेराव , पूजा कोचुरे , प्रतिभा बनसोडे, सुमन बैसाणे, चारुशीला सुरळके, वर्षा कोचुरे, गीता सोनवणे, कल्पना तायडे , सरला भालेराव, मनीषा भालेराव, आशा सपकाळे, सुनीता बैसाणे, आशा सैंदाणे, मंजुषा सैंदाणे आदींसह बहुसंख्य उपासक, उपासिका हजर होते.

Spread the love