“आम्हाला ७२ लाख मत, जागा १०, अजित पवार गटाला ५८ लाख मत, जागा ४१ आल्या”, पवारांनी मांडलं गणित

0
22

मुंबई -: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी २३० पेक्षा अधिक मतदारसंघावर त्यांचे आमदार निवडून आलेत. तर विरोधकांना विरोधी पक्षनेते पद देखील मिळवता आले नाही.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडी गावापासून ईव्हीएमच्या विरोधात एल्गार पुकारणार आहेत. त्याआधीच शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील कॅक्युलेशन मांडले.

शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मत ७२ लाख आहेत. मात्र आमचे उमेदवार फक्त दहा निवडून आले आहेत. अजित पवार यांच्या गटाचे ५८ लाख मते आहेत. तर त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले आहेत. ८० लाख मत मिळालेल्या पक्षाचे १५ तर ७९ लाख मत मिळालेल्या प७ाचे ५७ आमदार निवडून येतात. असे कॅलक्युलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही. तोपर्यंत याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र मतांचे आकडे आश्चार्यकारक आहेत. असे शरद पवार यांनी म्हटले. ते कोल्हापुरात बोलत होते.

दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, चार निवडणुका आत्ताच झाल्या आहेत. हरियाणामध्ये मी स्व: गेलो होते, तिथे भाजपची अवस्था अतिशय कठीण होती, पण तिथे भाजपा सत्तेवर आली. काश्मिरमध्ये निवडणूक झाली. तिथे फारूक अब्दुल्ल यांचा पक्ष आला. महाराष्ट्राची निवडणूक झाली. इथे भाजपला यश आले. मात्र झारखंडला मात्र त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सांगू शकतात की एका निवडणुकीत तुम्ही जिंकलात, एका निवडणुकीत आम्ही जिंकलो. ईव्हीएमचा काही संबंध नाही. मोठी राज्य आहेत. तिथे भाजप आहे आणि छोटी राज्ये आहेत. तिथे अनेक पक्ष आहेत.

Spread the love